नमस्कार मित्रांनो आपण सर्वांना माहीतच आहे की या वर्षाची पीक पाहणी आपण स्वतः करायची आहे. ई पीक पाहणी हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्र राज्य करिता राबविण्यात येत असून. महाराष्ट्र शासनाने ई पीक पाहणी करण्याचा अंतिम दिनांक 14 ऑक्टोंबर 2021 दिलेला आहे. तरी बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्यावी, असे महाराष्ट्र शासन आवाहन शेतकऱ्यांना करत आहे,
शेतकऱ्यांना हे ॲप वापरण्यासाठी खालील गोष्टींची गरज आहे
- 4.4 किटकॅट किंवा त्यापेक्षा जास्त वर्जन चा मोबाईल शेतकऱ्याकडे असला पाहिजे
- सेंसर a- जीपीएस
- इंटरनेट थ्री जी फोरजी किंवा वाय-फाय असले पाहिजे
- आपल्या मोबाईलची रॅम वन जीबी पेक्षा जास्त पाहिजे
- मराठी टायपिंग साठी गुगल इंडिक कीबोर्ड पाहिजे
डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
नोंदणी करण्यासाठी आपल्याला पुढील गोष्टी आवश्यक आहे किंवा आपल्या जवळ असणे आवश्यक आहे.
- सातबारा / खाते क्रमांक किंवा गट क्रमांक
पीक पाहणी कशी करावी हे समजून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
पिक पाणी साठी जमिनीचे क्षेत्र हेक्टर, एकर, गुंठा, आर काय असतं ते समजून घेऊया
जमीन मोजण्यासाठी हेक्टर, एकर ,गुंठा, या एककाचा वापर केला जातो. एक हेक्टर म्हणजे किती ? एक एकर म्हणजे किती ?गुंठा म्हणजे किती? ते पुढे दिले आहे , इथून तुम्ही समजून घ्या .
- एक आर = एक गुंठा
- एक गुंठा=(३३ फुट गुणिले ३३ फुट )=१०८९ चौरस फूट
- एक एकर= 40 गुंठे
- एक हेक्टर= शंभर गुंठे= अडीच एकर
अशाप्रकारे जमिनीची मोजमापे आहेत यावरून आपल्याला पीक पाणी ॲप मध्ये क्षेत्र कसे भरायचे याची थोडीफार माहिती मिळाली असेल, आपल्याला काही अडचण असल्यास कमेंट करा, मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल.


0 Comments