Header Ads Widget

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

एक अर्ज रेशन दुकानातील घोटाळा येईल बाहेर -माहिती अधिकार


 एक अर्ज रेशन दुकानदार आतील घोटाळा बाहेर 👇

एक अर्ज रेशन दुकानदार आतील घोटाळा बाहेर ???? तुम्हीपण रेशन दुकानदाराच्या कारभाराने त्रस्त असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी योग्य आहे. आज आपण केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार अर्ज कसा करायचा, याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो तुम्हाला वेगवेगळ्या अडचणी तुमच्या भागात येत असतील, तुम्हाला रेशन दुकानदार वेगवेगळे कारण सांगत असतील, की ह्या वेळेस रेशन पुरवठा कमी आलेला आहे, वरूनच रेशन पुरवठा कमी येतो, प्रत्येक पोत्यामध्ये थोडं थोडं कमी असतेच, मग आम्ही सर्वांना कसं वाटायचं, किंवा तुम्हाला काय काय रेशन दुकानदार आतून दिले जाते आणि तुम्हाला रेशन दुकानदार पावती का देत नाही, याची संपूर्ण माहिती आपण यामध्ये बघणार आहोत.

केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार अर्ज

मित्रांनो यामध्ये आपल्याला खालील बाबींची माहिती मिळू शकेल👇

  • आपल्या कार्यालया अंतर्गत किती स्वस्त धान्य दुकाने आहेत त्यांचे नाव आणि पत्ते द्यावेत अशी मागणी तुम्ही करू शकता.
  • आपल्या कार्यालयात अंतर्गत असलेल्या दुकान नंबर स्वस्त धान्य दुकानांमध्ये आलेल्या महिन्याला किंवा वर्षाला अन्नधान्य व तेल रॉकेल विक्री झालेला कोटा शिल्लक कोटा पुढील महिन्यात समायोजित झालेला कोटा आदी नोंदी असणाऱ्या रजिस्ट्रीची सत्यप्रत तो तसेच विक्री पावती बुकाची सत्यप्रत मागू शकतो,
  • तसेच ठराविक वर्षांमध्ये या तक्रार व्यायाम मधून किती तक्रारी प्राप्त ?झालेल्या तक्रारी आलेल्या स्वस्त धान्य दुकानदार विरुद्ध काय कारवाई करण्यात आली ?केलेल्या कारवाईचा तपशील तक्रार असले की कळविली काय असल्यास संबंधित पत्रव्यवहाराच्या छत्रपती मिळत ही सर्व माहिती आपण मागू शकतो.
  • तुम्ही तुम्हाला पाहिजे असलेल्या तारखांना पर्यंत आपल्या अधिकारा अंतर्गत येणाऱ्या सर्व शिधावाटप दुकानदारांकडून तक्रार करीत असलेल्या तक्रारींच्या सत्य प्रत उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करू शकता.
  • आपल्या कार्यालयांतर्गत असणाऱ्या घाऊक तेल विक्रेत्यांची संख्या किती? प्रत्येक दुकानाच्या दर्शनी भागावर दुकानाचे नाव आणि पत्ता, विक्री दर ,स्थानिक दक्षता समिती यांचे नाव व पत्ते ,लोकसंख्या व युनिट ,विवरण प्रमाण तसेच तक्रार करण्याच्या अधिकाऱ्यांचे नाव पत्ता फोन नंबर असा विस्तृत व व परिपूर्ण माहिती असणारा फलक लावला आहे काय ? असल्यास असे बोर्ड प्रत्येक दुकानात लावले असल्यास सक्षम अधिकाऱ्यांच्या निरीक्षण अहवालाची प्रत द्यावी अशी मागणी आपण करू शकतो.
  • सदर माहिती आपण टपालाने हवी असल्यास टपालाने मागू शकतो किंवा आपण घेऊ शकतो
  • अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असल्यास त्याला कोणत्या प्रकारची फी नाही मात्र अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असेल तर त्याला दहा रुपयाचं कोर्ट स्टॅम्प लावून नंतर तो अर्ज शिधावाटप नियंत्रक अधिकारी किंवा पुरवठा अधिकारी तहसीलदार यांच्याकडे जमा करावे लागेल 

Post a Comment

0 Comments